

छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद देवगिरी किल्ल्याला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. शहरातील कांचनवाडी अग्निशमन पथकाने धाव घेतली. मात्र आग किल्ल्यावर असल्याने अग्निशमन वाहनाला किल्ल्यावर जाण्यासाठी अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे अग्निशमन विभागाने झाडांची झुडपे, पानांच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अग्निशमन इंचार्ज अधिकारी विनायक कदम यांनी दै. नवशक्तिशी बोलताना माहिती दिली.
यावेळी छगन सलामबाद, रीतेश कस्तुरे, इरफान पठाण, मयूर कुमावत, राऊत सह आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आगविझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीत दौलताबाद किल्ल्यावरील परिसरातील सरपटनारे प्राणी, मोर लाडोर, माकड, पक्षांना धोका निर्माण झाला होता.
आग लागल्या ठिकाणापर्यंत जाऊ शकत नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. यावेळी दौलताबाद पोलीस निरेक्षक रेखा लोढे, उपनिरेक्षक वसत शेळके, अमलदार खुशाल पाटील, सुदर्शन राजपुत, महेश घुगे, साहेबराव राठोड, पोलीस निरेक्षक अशोक भंडारी, पी.सी. पवार, अतुल पवार, संदिप पवार, ज्ञानेश्वर खंडागळे, किल्ल्यातील कर्मचारी जी.पी. बनकर, सागर जाधव, हमिद शेख कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.