सांगलीची प्रतीक्षा बांगडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्रामध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली असून प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील यांच्यात अंतिम लढत झाली
सांगलीची प्रतीक्षा बांगडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

आज महाराष्ट्रामध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यावेळी सांगलीची प्रतीक्षा बागडीने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. तिने कल्याणमधील वैष्णवी पाटीलला चितपट करत हा मान मिळवला. सांगलीमध्ये झालेल्या या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान कोण पटकावणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

गुरुवारपासून सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सांगली जिल्ह्यातील तुंग येथील प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील यांच्यामध्ये लढत झाली. या सामन्यात दोघीही मध्यांतरापर्यंत ४ गुणांनी बरोबरीत होत्या. मात्र, त्यानंतर प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटीलला चितपट करत ४ विरुध्द १० गुणांनी महिला केसरी पदकावर आपले नाव कोरले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in