देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; व्हॅन झाडावर धडकल्याने चार जण ठार, सहा जखमी

यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एका भाविकाला वडूज येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; व्हॅन झाडावर धडकल्याने चार जण ठार,  सहा जखमी

सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडीला देवदर्शानासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने मोठा घाला घातला आहे. भक्तांना घेऊन जाणारी मारुती ओमनी व्हॅन खटाव तालुक्यातील सूर्याची वाडी येते रस्त्याच्या कडेला असलेला झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघतात चार जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर एका भाविकाला वडूज येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

खटाव तालुक्यातील सिद्देश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख याच्या ओमनी मारुती व्हॅनमधून दहा जण सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडीला देवदर्शनासाठी निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान, असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आलं. या अपघातामुळे परिसरात शोककळा परसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in