राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशातून वाढता विरोध

राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशातून वाढता विरोध

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातून वाढता विरोध होऊ लागला आहे. आधी मराठीच्या मुद्द्यांवर उत्तर भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी भूमिका बदलत हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. मात्र, त्यांच्या जुन्या भूमिका आज त्यांना अडचणीत आणताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात राज ठाकरे यांच्या ५ जूनच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनीही राज ठाकरे यांना, एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिला आहे.

राज ठाकरे दबंग नसून उंदीर!

राज ठाकरे दबंग नसून उंदीर आहेत अशा शब्दांत भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ‘बृजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. एका खासदाराने मांडलेले मत हे उत्तर प्रदेशचे असू शकत नाही. आमच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे’.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in