राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा फत्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे
File Photo
File PhotoANI

'बिपरजॉय' चक्रिवादळामुळे राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला. मान्सूनने सर्व राज्य व्यापले असले तरी राज्यभर समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणवठे आटत आले आहेत. अनेक ठिकाणच्या धरणांमधील पाणीसाठा फत्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला ऊन पावसाचा खेळ सध्या थांबला आहे. सध्या मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक भागात जोरदार सरी बरसत आहे.

मुंबईत देखील आज जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना १७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर १८ जुलैला रत्नागिरी, रायगडसह पुण्यात देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामुळे या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अनेक जलसाठे पुरेसे भरलेले नाही. त्यामुळे राज्यावर पाणीसंकट निर्माण झालं आहे. त्यामुळे अजुनही राज्यभर चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in