...पण यापुढे मी देशातील सत्तेची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही - शरद पवार

२०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला शौचालय, प्रत्येक नागरिकाला घर, पिण्याचे स्वच्छ पाणी अशी कितीतरी आश्वासने दिली गेली; मात्र
...पण यापुढे मी देशातील सत्तेची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही - शरद पवार
ANI

“मोरारजी देसाई यांनी वयाच्या ८१व्या वर्षी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली होती, माझे वय आता ८२ झाले आहे; पण यापुढे मी देशातील सत्तेची कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.“केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करणार आहोत,” असेही पवार यांनी सांगितले.

आपण राज्यातील काही ठरावीक जिल्ह्यांचा दौरा करणार असून, त्याची सुरुवात ठाण्यापासून केली असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, दौलत दरोडा, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात चांगले काम केले असून त्याचा पक्षाला चांगला फायदा झाला आहे; मात्र दुसरीकडे २०१४ पासून केंद्रात सत्तेवर आलेल्या सरकारने आतापर्यंत जी जी आश्वासने दिली, त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. २०१४ साली अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले; मात्र ते काही पूर्ण झाले नाही. २०२२ साली न्यू इंडियाचे आश्वासन, २०२४ पर्यंत पाच ट्रिलयन इकॉनॉमीचे नवे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक ग्रामपंचायतीत इंटरनेट पोहोचवणार, २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला शौचालय, प्रत्येक नागरिकाला घर, पिण्याचे स्वच्छ पाणी अशी कितीतरी आश्वासने दिली गेली; मात्र यातील एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असा आरोप पवार यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in