राज्यातील मतदारांच्या संख्येत वाढ

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारराजाची महत्त्वाची भूमिका असते. राज्यात ३० ऑगस्ट २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारराजाची महत्त्वाची भूमिका असते. राज्यात ३० ऑगस्ट २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ६ ऑगस्ट रोजी  ९ कोटी ३६ लाख ७५ हजार ९३४ होती. मात्र अंतिम मतदार यादीनुसार राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ एवढी असून मतदार संख्येत १६ लाख ९८ हजार ३६८ ने वाढ झाली आहे. तर दिव्यांग व तरुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर, राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा "विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम-२०२४ (दुसरा)" कार्यक्रम २५ जून २०२४ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार ३० ऑगस्ट २०२४ रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे अंतिम मतदार यादीमध्ये नविन युवक मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेमध्ये अंतिम मतदार यादीमधील नवीन मतदारांमध्ये झालेली वाढ पुढीलप्रमाणे आहे.

रोजीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या ६,०६,५०५ एवढी होती. आता ३० ऑगस्ट रोजीच्या अंतिम मतदार यादीनुसार दिव्यांग मतदारांची नोंदणी ६,२८,०६३ इतकी झालेली आहे. त्यानुसार अंतीम मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारामध्ये २१,५५८ इतक्या संख्येने वाढ झालेली आहे.

महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

मतदान ओळखपत्र देण्यास सुरुवात!

कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना, नोदींमध्ये दुरुस्ती केलेल्या मतदारांना मतदान छायाचित्र ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in