
शिवराज्याभिषेकाच्या दिवशी कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजेबचे फोटो स्टेट्स ठेवल्याने परिस्थिती चांगलीच चिघळली. या प्रकरणावर अनेक हिंदुत्तवादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसंच या घटनेच्या निषेधासाठी मोर्चा काढायंच ठरवलं. जिल्ह्यात जमावबंदी असताना देखील संघटना मोर्चा काढण्यावर ठाम होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ठिय्या आंदोलन करण्याचं आवाहन केल. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी जमावावला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसंच अश्रृधुराच्या नळकांड्याचा देखील फोडाव्या लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरच्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी स्वत: आणि गृहमंत्री अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं सांगितलं. तसंच कुणीही कायदा हातात घेऊ नका. कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, तशीच लोकांचीही सहकार्य करण्याची जबाबदारी आहे, असं म्हटलं आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोल्हापुरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे. कोल्हापूरात विरोधी पक्षाचे लोक दंगल घडवण्यात येणार असल्याचं म्हटले आहेत. काही तरुणांनी औरंगजेब आणि टीपू सुलतानचे फोटो स्टेट्सला ठेवले. औरंगजेबचे उदात्तीकरणं केलं जात आहे. हे सगळ कोण सांगत आहे, सगळ्या चौकशीनंतर मी या गोष्टी सांगेन. तसंच दंगली घडवण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणणं हा योगायोग असू शकत नाही. एका समाजाचे आणि विरोधी पक्षातील लोक उदात्तीकरण करत असून औरंगजेबचे उदात्तीकरण खपवून घेणार नसल्याचं सांगत हे औरंगजेबला देशभक्त ठरवायला निघालेले लोक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोल्हापुरातल्या प्रत्येक चौकात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, कोणत्याही अफवा पसरुन पुन्हा परिस्थिती चिघळू नये, याठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.