जळगावमध्ये एकनाथ खडसेंना भाजपचा दणका; दूध संघाच्या निवडणुकीत केला दारुण पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलचा दारुण पराभव झाला असून भाजपने विजय मिळवला
जळगावमध्ये एकनाथ खडसेंना भाजपचा दणका; दूध संघाच्या निवडणुकीत केला दारुण पराभव

जळगावमधील जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा दणका बसला. भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय प्राप्त केला. तर, एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला. हा खडसेंना भाजप-शिंदे गटाने दिलेला सर्वात मोठा दणका आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील हेदेखील विजयी झाले. तर, दुसरीकडे खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा पराभव झाला.

निकालानंतर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "आम्ही पारदर्शकपणे काम केले. पण, काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यात आम्ही कमी पडलो." अशी टीका केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील प्रतिउत्तर देताना म्हणाले की, " एकनाथ खडसेंचे खोक्यात कमी पडलो, असे म्हणणे योग्य नाही. कारण, त्यांचे ४ प्रतिनिधी निवडून आले. याचा अर्थ त्यांनीही खोके वाटले का? जनतेने कामावर पसंती दिली आहे." तर, " या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. लोकशाहीमध्ये सर्व नागरिक मिळून यश मिळते. फक्त मी - मी करून चालत नाही. मतदारांनी खडसेंचा हाच अहंकार मोडून काढला. हा पराभव म्हणजे त्यांच्या अहंकाराचा पराभव आहे," असे मत चिमणराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in