दौऱ्यासाठी पैसे मागणाऱ्यांना जरांगेंचा कडक इशारा ; म्हणाले, "जर कोणी पैसै मागितले तर..."

१५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा असेल. कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
दौऱ्यासाठी पैसे मागणाऱ्यांना जरांगेंचा कडक इशारा ; म्हणाले, "जर कोणी पैसै मागितले तर..."
Hp

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी तिसरा दौरा जाहीर केला आहे. १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा असेल. कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दरम्यान, मनोज जरांगे-पाटीलांनी १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साखली उपोषण सुरु होणार असल्याचं देखील जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, शाहू महाराजांच्या स्मारकापासून सुरुवात होत आहे. या दरम्यान त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. या दौऱ्यासाठी कुणीही कुणाकडे पैसे मागू नयेत, तसं लक्षात आलं तर कारवाई केली जाईल,असं जरांगे म्हणाले आहेत.

या बाबात बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, समाजातील डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी, श्रीमंत गरीब कुणीही दौऱ्याच्या नावाखाली कुणालाही पैसै देऊ नयेत. हा लढा गरीब मराठ्यांचा आहे. तो मराठे लढत आहेत. लोक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देणाऱ्यांनीही पैसे देऊ नयेत. कारण त्यामुळे आंदोलनाला डाग लागण्याची शक्यता आहे.

राज्यात यापूर्वी झालेल्या दौरे आणि सभा याचा खर्च कधीच कुणाला मागितलेला नाही. त्यामुळे इथून पुढे देखील कुणी पैसे मागू देऊ नये. कुणी म्हणेल, पाटील तसं म्हणत असतात...त्यांना तसं म्हणावं लागतं. तरी ऐकू नका आणि पैसे देऊ नका. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्या देण्यासाठी आहे. पैसे कमावण्यासाठी नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in