Latur: आणखी एक माजी आमदार शरद पवारांच्या गळाला ; भाजपची साथ सोडत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस विनायकराव पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत
Latur: आणखी एक माजी आमदार शरद पवारांच्या गळाला ; भाजपची साथ सोडत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. अशात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची साथ सोडत अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना आता एका माजी आमदाराने भाजपाला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विनायकराव पाटील असं या माजी आमदाराचं नाव असून त्यांनी स्वत: हा निर्णय जारी केला आहे. २९ ऑक्टोबर रोजी विनायकराव पाटील हे शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करणार आहेत.

यामुळे घेतला पक्ष बदलण्याचा निर्णय

विनायकराव पाटील यांना यावेळी गटबाजी संपून आपली उमेदवारी निश्चित होई अशी आशा होती. मात्र, जिल्हाध्यक्षपदी त्यांच्या निवडणुकीत बंडखोरी केले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागल्याने त्यांच्या गटात अस्वस्थला वाढली. त्यात जिल्ह्यात भाजपचे अनेक गट निर्णाय झाल्याने विनायकराव पाटील यांची घुसमट वाढली. त्यामुळे विनायकराव यांनी राष्ट्रवादीची वाट धरली.

विनायकराव पाटील कोण आहेत?

लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस विनायकराव पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्यमंत्री पदावर देखील काम केलं आहे. गत वेळेस भाजपातील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी भाजपातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीत जाण्याच निर्णय घेतला.

मात्र, त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह आहेत. गेल्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणून आलेले आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे समर्थक आहेत. त्यामुळे आता बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात आता विनायक पाटलांना राष्ट्रवादीत जाऊन दंड थोपटलं आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in