दादागिरी केली तर मोडून काढू : उद्धव ठाकरे

दादागिरी केली तर मोडून काढू  : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेANI

हनुमान चालीसा बोलायला आमच्या घरात यायचे आहे. तुमची संस्कृती असेल तर या घरात; पण घरात येताना नीट या. दादागिरी करून घरात याल तर ती दादागिरी मोडून काढू, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकाना दिला. देशात सध्या नवहिंदूत्व आले आहे. ते ‘तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे’ असे विचारत आहे, त्याला लवकरच एक सभा घेऊन उत्तर देवू, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण बेस्टच्या कुलाबा येथील मुख्यालयात झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, अनिल परब, आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मुंबईकरांसाठी आम्ही दर्जेदार काम करत आहोत. खासगीप्रमाणे पालिका शाळांचा दर्जा सुधारला आहे. लोक खासगीमधून पालिका शाळांकडे वळत आहेत. बेस्टच्या बसचा, बस स्टॉपचा दर्जा सुधारत आहे. बस स्टॉपची दखल केंद्र सरकारने घेतली आहे, ही आमच्या चांगल्या कामाची पोहोचपावती आहे. हाच फरक आमच्या आणि राष्ट्रपती राजवटीत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.

बिन कामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत देत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसे व भाजपला टोला लगावला. ‘‘हिंदुत्व सोडलं, अशी आमच्यावर टीका केली जाते. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का सोडलं बोलायला, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला आहे. बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. कोर्टाने आदेश दिले म्हणून राम मंदिर बांधायला घेतले आहे. आमचे हिंदुत्व गदाधारी आहे. घंटाधारी लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.