मुंबई : राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवलेत, मात्र महाराष्ट्राच्या जनतेने पियुष गोयल यांना निवडून दिलं आणि ते गुणगान गुजरातचे गातायत. तामिळनाडू सरकारने त्यांच्या राज्यात बाहेरील गुंतवणूक आणली, मात्र महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मॅग्नेटिक धोरण कागदावरच, असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्सवर लगावला आहे.