"छगन भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मंत्री झाले," परभणीतील सभेतून जरांगेंचा हल्लाबोल

आता भुजबळांना पाडणारच, असं येवल्यातील लोक बोलत असल्याचंही जरांगे म्हणाले
"छगन भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मंत्री झाले," परभणीतील सभेतून जरांगेंचा हल्लाबोल

परभणी : छगन भुजबळ मराठ्यांच्या जीवावर मंत्री झाले, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. परभणीतील सभेत ते बोलत होते. आता भुजबळांना पाडणारच, असं येवल्यातील लोक बोलत असल्याचंही जरांगे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

परभणीमध्ये मराठा समाजातील बांधवांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मी याचसाठी सांगितलं होतं, मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झाला आहेस, सावध राहा. आता येवल्यातील लोक म्हणतायत, पाटील आता तुम्ही निवडून द्या म्हटला तरीही आम्ही त्याला (छगन भुजबळ) पाडणार आहे. तो म्हणाला मी मराठ्याच्या आरक्षणात पाचर ठोकली, आता मराठ्यांनी खुटा ठोकलाय. "

१३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याची मागणी-

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. त्यांनी आपलं आंदोलन १३ जुलैपर्यंत स्थगित केलं आहे. त्याचवेळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजानं जालन्यातील वडीगोद्री येथे आंदोलन सुरु केलं होतं. सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंनी आंदोलन मागे घेतलं आहे. दोन्ही समाजातील आंदोलकांनी आंदोलन तुर्तास मागे घेतलं असलं तरी आरक्षणाचा प्रश्न अजून संपलेला नाही. त्यामुळं सरकार यामधून कशी वाट काढतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in