Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य; महाराष्ट्रभरातून टीकेची झोड!

एका मराठी वृत्तवाहिनीसमोर कृषिमंत्री अब्दुल सत्तर (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंचा यांचा एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले.
Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य; महाराष्ट्रभरातून टीकेची झोड!

महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तर (Abdul Sattar) हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असताना. यावेळी मात्र, त्यांनी आपल्या सीमा सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरुद्ध बोलताना शिवीचा वापर करत एकेरी उल्लेख केला. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रभरातून टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तर यांना पत्रकाराकडून प्रश्न विचारण्यात आला. 'तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी, तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असे म्हटले. यावर काय सांगाल?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देताना आक्षेपार्ह्य भाषा वापरली.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला २४ तासांचा अल्टिमेटम

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील केली टीका

शिव्या मुकाट्याने सहन करू असा होणार नाही: रोहित पवार

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in