आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, तर्क वितकांना उधान आले आहे.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

अनिलराज रोकडे / वसई

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, तथा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून, तर्क वितकांना उधान आले आहे.

बहुजन विकास आघाडी पक्षाने राज्यात सत्ता स्थापना करताना आधी महाविकास आघाडी पक्षाला आणि राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना (शिंदे गट) भाजप महायुतीला पाठिंबा दिलेला आहे; मात्र गेल्या पालघर लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीचे नेते, तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र

राज्याच्या अधिवेशन काळात सर्वच आमदार विविध पक्षातील नेते मंडळींना भेटत असतात. मतदार संघातील कामे व योजनांचा पाठपुरावा, तसेच परस्पर संपर्क, स्नेह संवर्धन हाही त्यामागील हेतू असतो. तर काही भेटी विधान भवन परिसरात वावरताना 'देखल्या देवा दंडवत' या स्वरूपाच्याही असतात. त्यामुळे आमदार ठाकूर यांचा गेल्या चार दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित

पवार, उबाठा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजप आमदार गणेश नाईक यांच्याशी गाठीभेटी आणि संपर्क झाल्याची छायाचित्रे झळकली आहेत. परंतु शरद पवार यांची भेट या कोणत्याही प्रकारात न मोडणारी आहे.

फडणवीस आणि हितेंद्र ठाकूर यांच्यातील कलगीतुरा शिगेला जाऊन तणाव वाढला होता. ही पार्श्वभूमी आणि लोकसभा निवडणुकांचे लागलेले निकाल लक्षात घेता, ठाकुरांनी पवार यांची भेट घेणे औत्सुक्याचे ठरले आहे.

भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

शिवसेना आणि भाजपाच्या जागा वाटपात पालघरची जागा भाजपाला जाऊन, त्यांनी अॅड. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली. बविआने बोईसरचे आपले आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी आधीच घोषित केलेली होती. उबाठा सेनेतर्फे भारती कामडी उमेदवार होत्या. असा येथे तिरंगी सामना होऊन, प्रचारादरम्यान जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठाकूरांविरोधात प्रखर टीकाटिप्पणी झाली. आमदार ठाकूर यांनीही या दोघा नेत्यांना आपल्या शैलीत जशास तसे प्रत्युत्तर दिले. ही कटूता ताजीच असून, त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांची भेट घेण्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in