'बिपरजॉय' चक्रिवादळामुळे यंदा मान्सून लांबणीवर पडला आहे. अजूनही मान्सून महाराष्ट्रभरपुर्ण ताकदीने सक्रिय झालेल्या नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीची सर्व माशागत करुन बी-बियाणे आणून शेतकरी पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत आहे. तर महानगरातील लोकांचं देखील उकाड्याने हाल होत आहेत. सर्वजण चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहेत. मुंबई आणि यांसारख्या शहरात मान्सूनची अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. या दोन्ही शहरात २५ जून नंतर मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
आज विदर्भात मान्सून दाखल झाला असून नागपूरसह अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांनी आज सुटकेचा श्वास सोडला आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात २५ तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २७ जूननंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जाही करण्यात येण्याची देखली शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हात आज पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहे. जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या भागात पाऊस पडला असून अजूनही अर्ध्याहून अधिक जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या तळकोकणात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस लांबल्याने नांदेड जिल्ह्यात देखील पेरण्या खोळंबल्या आहेत.