मालेगावमध्ये भीषण आग: अनेक कारखान्यांना आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात भीषण अपघात झाला. यामध्ये अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण आगीचे दृश्य पाहायला मिळाले.
मालेगावमध्ये भीषण आग: अनेक कारखान्यांना आग, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रातील नाशिकमधील आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच एका फर्निचर मॉलसह भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. तर, आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर मुंबईकडे येणाऱ्या हावडा मेलच्या बोगीमध्ये आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे.

तसेच, नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात भीषण अपघात झाला. यामध्ये अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण आगीचे दृश्य पाहायला मिळाले. ही घटना सकाळी घडली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कारखाने जळताना दिसत आहेत. या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in