तात्या वाट बघतोय येताय ना?; मनसेच्या वसंत मोरेंना अजित पवारांकडून पक्षप्रवेशाची ऑफर

पुण्यातील मनसेचे (MNS) तडफदार नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली.
तात्या वाट बघतोय येताय ना?; मनसेच्या वसंत मोरेंना अजित पवारांकडून पक्षप्रवेशाची ऑफर

पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) तडफदार नेते वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली. पुण्यामध्ये झालेल्या एका लग्नामध्ये मनसेचे वसंत मोरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट झाली. यावेळी, 'तात्या, कधी येताय?, वाट पाहतोय' असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. खुद्द, वसंत मोरे यांनीदेखील यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, 'मी पक्ष सोडणार नाही' या मतावर ते ठाम आहेत.

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे आपल्या पक्षावर नाराज असल्याची बातमी राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरून ते दुसऱ्या पक्षात जाणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. एकीकडे राज ठाकरे हे पक्षबांधणीसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे वसंत मोरेंना फक्त राष्ट्रवादीच नव्हे, ठाकरे गटाच्या शिवसेनेकडूनही पक्षप्रवेशाची ऑफर आली. मात्र, असे असले तरीही वसंत मोरेंनी पक्ष सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली होती. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे मनसेवर नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. मात्र वसंत मोरे आणि संजय राऊतांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in