Ajit Pawar : ...नाहीतर माझा श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावा लागला असता; असं का म्हणाले अजित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघाताचा सांगितला किस्सा
Ajit Pawar : ...नाहीतर माझा श्रद्धांजली कार्यक्रम घ्यावा लागला असता; असं का म्हणाले अजित पवार?

एकीकडे काल राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत घडलेला अपघात ताजा असताना राष्ट्रवादीचेच नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. बारामतीमध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार हे संबोधन करताना म्हणाले की, "तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघालो होतो. पण मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहचतो तेवढ्यातच काही सेकंद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो. नाहीतर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती," असा जीवघेणा अनुभव त्यांनी सांगितला.

अजित पवार म्हणाले की, "पुणेमधील हर्डीकर हॉस्पिटलमध्ये उद्घाटनासाठी चौथ्या मजल्यावर जाताना लिफ्ट बंद पडली आणि काही क्षणात लिफ्ट चालू होऊन काही कळायच्या आत थेट जमिनीवर आदळली. लिफ्टचा दरवाजा तोडून आम्ही बाहेर पडलो. याबद्दल मी कोणासोबतही वाच्यता केली नाही. अगदी माध्यमांनासुद्धा बोललो नाही. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली असती. मात्र, आज तुम्ही घरची माणसे असल्याने मला राहवले नाही,” पुढे ते म्हणाले की, "शनिवारी माझ्या वडिलांचा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीला आलो. मात्र, घडलेला प्रसंग मी सुनेत्राच्या कानावरही घातला नाही आणि कुटुंबीयांनाही सांगितला नाही. प्रसंग बाका होता, पण त्यातून आम्ही वाचलो,"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in