पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या विधानाने खळबळ

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांची खेळी असल्याचे विधान राष्ट्रवादीच्या नेत्याने केले
पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी?; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याच्या विधानाने खळबळ

२३ नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा चर्चा अजूनही सुरु आहे. अनेकदा अजित पवार यांना याबाबतीत लक्ष करण्यात येते. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा एका या शपथविधीचा चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. ते म्हणाले की, "अजित पवार भुलले असतील असे मला वाटत नाही. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. त्यामुळे ती उठवण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. कदाचित यासाठी शरद पवारांनी केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली, आज महत्त्व द्यावे असे मला वाटत नाही."

पुढे ते म्हणाले "त्या घटनेनंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकारमध्ये त्यांनी काम केले. राष्ट्रवादी फुटली नाही, तर शिवसेनेचे आमदार गेल्याने सरकार कोसळले. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत साथ दिली हे नाकारता येणार नाही." त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवर चर्चा सुरु झाली. मात्र, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले की, "मला जो प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मी कदाचित शब्द वापरला होता. भाजपकडे राष्ट्रवादीचा कल आहे अशी टिप्पणी कोणीतरी केली होती. त्याला देण्यात आलेली ही प्रतिक्रिया होती. त्यामुळे शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली हे नाकारता येणार नाही. त्यामुळे ते कसं आणि काय झालं हे माहिती नाही. पण शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ झाला,"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in