उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य नको! दीपक केसरकरांचा सोमय्यांना इशारा

आमचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काही चुकीचे वक्तव्य करण्यात येऊ नये. ही विनंती फडणवीसांनी मान्य केली होती
उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य नको! दीपक केसरकरांचा सोमय्यांना इशारा
ANI

उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. याबाबत फडणवीसांकडे आम्ही तक्रार करणार असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी सांगितले. केसरकरांचे हे वक्तव्य शिवसैनिकांना चुचकारण्यासाठी आहे की शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचे नेतृत्व अद्यापही मान्य आहे का, याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

‘किरीट सोमय्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे, ते कुणालाही आवडणार नाही. आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा आमचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले होते, की आमचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काही चुकीचे वक्तव्य करण्यात येऊ नये. ही विनंती फडणवीसांनी मान्य केली होती. त्यांनी आमच्यासमोर भाजप नेत्यांना तशा सूचना केल्या होत्या. यासंदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. जे ठरले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी विनंती करू, असेही दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावर भाजप आणि शिंदे गटात वाद रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे.

काय म्हणाले सोमय्या ?

मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केले,​​​​​​ असे ट्विट माजी खासदार किरीट सोमय्यांनी केले आहे, यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यासह एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यानंतर त्यांनी खोचक शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना भेटून त्यांचे अभिनंदन केले, याआधीच्या सरकारमधील लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज गेला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in