Sanjay Raut : राऊतांचा दिलासा नाहीच, तुरुंगातील मुक्काम वाढला

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल न्यायालयाने संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली
Sanjay Raut : राऊतांचा दिलासा नाहीच, तुरुंगातील मुक्काम वाढला
ANI

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगवासाची मुदत वाढवण्यात आली आहे. 8 दिवस ईडीच्या कोठडीनंतर संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज त्याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएल न्यायालयाने संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत पुन्हा आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात येणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडीची कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथे ईडीने त्यांची कोठडी मागितली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. न्यायालयाने संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहात घरचे जेवण आणि औषध देण्याची परवानगी दिली होती. आज पुन्हा त्यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाहीपत्राचाळ आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने समन्स बजावले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in