नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधक आक्रमक ; पदावर बसण्याचा अधिकार नाही म्हणत केला सभात्याग

यावेळी अपात्रतेचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावर पदावर बसण्याचा अधिकार नसल्याचं अनिल परब म्हणाले आहेत.
नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधक आक्रमक ;  पदावर बसण्याचा अधिकार नाही म्हणत केला सभात्याग
Published on

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी ठाकरे गटाने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे याच्याविरोधात खेळी केली आहे. ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्यासह २ जणांविरोधात अपात्रतेची नोटीस विधिमंडळ सचिवांना दिली आहे. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नैतिकदृष्ट्या विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर बसता येणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. तसंच बेकायदेशीर सभापतींचा धिक्कार असो अशा घोषणात देत विरोधकांनी सभात्याग केला.

यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवले म्हणाले की, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडलेले आहे. त्यामुळे पक्षाच्या पतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस दिली आहे. गोऱ्हे यांनी शिवसेना(उबाठा) पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे त्यांना नैतिकदृष्ट्या या पदावर बसता येणार नाही, असं दानवे म्हणाले.

यावेळी अपात्रतेचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावर पदावर बसण्याचा अधिकार नाही, असं ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in