पहलगाम दहशतवादी हल्ला; संशयितांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सहभागी संशयितांची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुरुवारी जाहीर केले आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरचे संग्रहित छायाचित्र
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरचे संग्रहित छायाचित्रसौजन्य - एएनआय
Published on

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सहभागी संशयितांची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गुरुवारी जाहीर केले आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केले. यासाठी त्यांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

दहशतवाद आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ठामपणे उभे आहोत. या गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची कोणतीही माहिती घेऊन पुढे येण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. "बक्षीस रकमेत भर घालून, दोषींना जबाबदार धरले जाईल आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल हेच उद्दिष्ट शिवसेनेचे आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडले ते बहुतेक पर्यटक होते. संशयितांना पकडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हे शिवसेनेच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी योगदान द्यावे आणि आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in