कोल्हापूरात ८ नोव्हेंबरला प्लेसमेंट ड्राईव्ह

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे
कोल्हापूरात ८ नोव्हेंबरला प्लेसमेंट ड्राईव्ह

कोल्हापूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे ११५ पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान १० वी, १२ वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ‍अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त माळी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in