PM Modi in Nagpur : मराठीतून भाषणाला सुरुवात ते विरोधकांवर टीका; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

समृद्धी महामार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अनेक विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी जनतेशी संवाद साधताना भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
PM Modi in Nagpur : मराठीतून भाषणाला सुरुवात ते विरोधकांवर टीका; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
@BJP4India

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नागपूरमध्ये अनेक विकासकामांचे उदघाटन केल्यानंतर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात ही मराठीतून केली. तसेच, त्यानंतर त्यांनी विरोधकांचा समाचारही घेतला. तसेच, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुकदेखील केले. "आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण पहिले गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला मी वंदन करतो," अशा शब्दात पंतप्रधानांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर, 'एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थासाठी देशाचे पैसे लुटले जात आहेत' अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

विरोधकांवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी देशाचे पैसे लुटण्याचे काम सध्या सुरु आहे. ही विकृती करदात्यांचे पैसे लुटण्याची आहे. हे असे शॉर्टकट वापरणारे राजकीय पक्ष आणि नेते हे देशाच्या करदात्याचे शत्रू आहेत. खोटी आश्वासने देऊन सरकारमध्ये यायचं असते, असे राजकीय पक्ष कधीच देश घडवू शकत नाहीत. काही राजकीय पक्ष हे भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यामध्ये गुंतले आहेत. काही पक्षांची विकासाची कामे म्हणजे आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया अशी आहेत. यामुळे देशाचे नुकसान होत आहे"

पुढे ते म्हणाले की, "शिंदे- फडणवीस सरकार हे उत्तम काम करत आहे. आजच्या या विकासकामांमधून स्पष्ट होते की, डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम आहे. २४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईल. त्यामुळे शेतकरी, भाविक, उद्योगांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. भारत पुढील २५ वर्षांचे धोरण समोर ठेवून काम करत आहे. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in