१५ दिवसांत राज्याच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये २ मोठे स्फोट होण्याचे सूचक विधान केले
१५ दिवसांत राज्याच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या सूचक विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ते म्हणाले की, "१५ दिवसानंतर महाराष्ट्रच्या राजकारणामध्ये २ मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत." असा गौप्यस्फोट केला आहे. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आमच्या युतीची काळजी करू नये," असा टोलादेखील लगावला आहे.

पुढे प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "पुलवामा हल्ल्याबाबत मी यापूर्वी बोललो होतो की ज्या गादीवर हल्ला झाला, त्या गाडीला संरक्षण नव्हते. ही माहिती मला मिळू शकते, तर मग सरकारलाही मिळू शकते. पण याबाबतीत सरकारला राजकारण करायचे होते." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, राजकारणासाठी या जवानांचा बाली दिला आहे का? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या गौप्यस्फोटाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in