केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून श्रीलंकेत गुरुवारी दाखल झाला. तर शुक्रवारी केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. सध्या केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस पडत आहे; पण वेग मंदावल्याने मान्सून आता येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

श्रीलंकेच्या निम्म्या भागासह, अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनने प्रगती केली आहे. केरळमध्ये १ जूनच्या आधी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनची वाटचाल जूनच्या सुरुवातीला धीम्या गतीने राहणार आहे. मान्सून यंदा अंदमानच्या दक्षिण समुद्रात वेळेआधी दाखल झाला. मात्र, पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. २८) दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्राच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून २७ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविली होती. दरम्यान, अरबी समुद्रात मागील काही दिवस मान्सून रेंगाळला असून, आता तो पुढे सरकला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in