मोदी - शहांचे एटीएम बंद करणार - नाना पटोले

मोदी - शहा यांच्यासाठी महाराष्ट्र हे एकप्रकारचे एटीएम आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर यांचे एटीएम बंद करत राज्यातील जनतेसाठी त्याचा वापर केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला दिला.
Nana Patole
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मोदी - शहा यांच्यासाठी महाराष्ट्र हे एकप्रकारचे एटीएम आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर यांचे एटीएम बंद करत राज्यातील जनतेसाठी त्याचा वापर केला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला दिला.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला झटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच महायुतीला धडकी भरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केले. परंतु गेल्या ५० दिवसांत ५० हून अधिक हल्ले झाले. भाजपला मात्र अशा घटनांशी काहीही देणे-घेणे दिसत नाही. महायुतीला हद्दपार करण्याची वेळ आली असून भगवा जिंकणार आणि तिरंगा फडकणार. तिरंग्याचे रक्षण भगवा करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे. मात्र स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना योग्य स्थान न देणे हा लोकशाहीचा खून आहे. भाजपला अजून सत्तेचा गर्व आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती नाहीशी केली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in