पुण्यामध्ये आगामी महापालिका निवडणूक आणि लोकसभा पोट निवडणुकीचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, पुण्यातील ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते बाळासाहेब चांदेरे हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून शिवसेना ठाकरे गटाने एक निवेदन जारी करून, त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे यात सांगितले आहे.
बाळासाहेब चांदेरे हे पुण्यातील ठाकरे गटाचे एक महत्त्वाचे नेते आहेत. अशामध्ये आज ते ठाकरे गटाला सोडचिठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून एक पत्रक काढण्यात आले. यामध्ये, पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे म्हंटले आहे. यानंतर आता ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि हवेली या तीन तालुक्यांची जबाबदारी बाळासाहेब चांदोरे यांच्याकडे होती. या तीनही विभागाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यामुळे शिंदे गटाला या विभागामध्ये त्यांचा चांगलाच फायदा होणार आहे.