राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 'सागर' भेट ; नेमकं कारण काय ?

राज ठाकरे सागर बंगल्यावर आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 'सागर' भेट ; नेमकं कारण काय ?
ANI

राज्यामध्ये सत्तेची गणित दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर अचानक भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहे. त्यामुळे फडणवीस यांना कुटुंबासह गणपती दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सागर बंगल्यावर आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, तासभर काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या अचानक भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप नेते अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबईत येत आहेत, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हेही पुढील आठवड्यात मुंबईत येणार आहेत. महापालिका निवडणुकीबाबत हे दोन्ही नेते चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहा मुंबईत येण्यापूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. बैठकीनंतरच्या पहिल्या बैठकीदरम्यान गेल्या आठवड्यात मनसेचा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in