काय ? एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती ?

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमनेसामने
काय ? एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंची उपस्थिती ?
ANI

शिवसेना कोणाची ही गाडी अजून पुढे सरकली नसली तरी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट हे एकमेकांवर कुरघोडी करायला अजिबात कमी पडत नाहीये. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात खडाजंगी चांगलीच रंगली आहे. मात्र यावेळी शिंदे गटाची एक वेगळीच खेळी समोर येत आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसेचे राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

दसरा मेळाव्याचे आयोजन कोण करणार यावरून वाद सुरू असतानाच आता या वादात नवा ट्विस्ट आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा ही परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने आपली रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ५६ वर्षांची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या या दसरा मेळाव्यामधून हिंदुत्वाची भूमिका मांडली जात असे. याच मुद्द्याला घेऊन हिंदुत्वाचा विचार करून या ठिकाणी दसरा मेळावा घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदे गटातून बोलले जात आहे. या सभेसाठी राज ठाकरेंसारख्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाऊ शकते, असे संकेत शिंदे गटाने दिले आहेत. शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणत्याही परिस्थितीत घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यापूर्वीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात इतर पक्षांच्या नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in