"तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले"; रामदास कदमांनी केली उद्धव ठाकरेंवर टीका

रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकांवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी घेतला समाचार
"तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले"; रामदास कदमांनी केली उद्धव ठाकरेंवर टीका

काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले असून उद्धव ठाकरेंसह भास्कर जाधवांवरही टीका केली आहे. "तुमचे हात भ्रष्टाचाराने बरबरटलेले आहेत. तुम्ही माझ्या नादाला लागू नका," असा इशारा त्यांनी युद्ध ठाकरेंना दिला आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, "शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान होऊन वागू लागलात. मी बोलणार तेच होणार अशा हुकुमशहा प्रवृत्तीसारखे तुम्ही वागले. मला बदनाम करण्याचे राजकारण तुम्ही केले." अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले की, "ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असे म्हणता. पण हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही. भांडुपचा आमदार अशोक पाटील यांनी जाहीर सभेत आमदारकीचा सौदा किती कोटीत झाला हे सांगितले होते. तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात धनुष्यबाण राहणार आहे का?" असा सवाल त्यांनी केला.

रामदास कदम यावेळी म्हणाले की, "अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलो आहे, मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका." असा इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले, "तुमच्या वडिलांच्या विचारांशी तुम्हीच बेईमानी केली. त्या वडिलांचे नाव सांगण्याचा अधिकार तुम्हाला हवा की नाही? याचे आत्मपरिक्षण करा. 'हे चोरलं, ते चोरलं' मग तू काय करत आहेस? झोपला आहे का?" असा सवाल त्यांनी यावेळी केला. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी १९ तारखेला देणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in