
ठरल्यावेळेच्या काही वेळ उशिराने सुरु झालेल्या मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपले पद सोडण्याची तयारी दाखवली. आपल्याला कोणत्याही गोष्टींचा अनुभव नसताना मी जिद्दीने काम करत आहे. २०१२ साली बाळासाहेब गेल्यानंतर २०१४ ला ६३ आमदार निवडून आले, तेव्हाही आपण हिंदूंचं होतो. शिवसेना आणि हिंदुत्व कधीच वेगळं नाही होऊ शकत, याबाबत विधानसभेत बोलणारा मी पहिला आहे असेही ते म्हणाले.
एकही आमदाराने जरी माझ्याविरुद्ध मतदान केले तर माझ्यासाठी ती शरमेची बाब असेल. माझ्याच लोकांना जर मी नको हवा असेल तर त्यांनी सुरत ला जाऊन सांगण्यापेक्षा माझ्याकडे येऊन सांगा मी कधीही माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. मला कोणत्याही प्रकारच्या पदाचा मोह नाही असेही त्यांनी सांगितले.