
रत्नागिरीमधील राजापूर येथे एका थार गाडीचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यावेळी दुचाकी स्वराला जबर मार लागल्याने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र, मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले. निधन झालेले दुचाकीस्वार हे पत्रकार असून त्यांचे नाव शशिकांत वारिसे होते. या अपघाताबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला. नाणारसंदर्भात लिहिले असल्याने त्यांचा घातपात झाला असल्याची शंका त्यांनी बोलून दाखवली. या सर्व प्रकरणाची दखल घेत खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार असल्याची ग्वाही दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले की, "नाणारसंदर्भात लिखाण करणाऱ्या शशिकांत वारिसे या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला. चालक पंढरीनाथ आंबेरकर हे रिफायनरी समर्थक असल्यामुळे या मृत्यूप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र पाठवून चौकशीची मागणी करण्यात येणार आहे. पंढरीनाथ आंबेरकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.