Ramdas Athawale : 'ती' खरी भीमशक्ती नाहीच; उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येण्याची चर्चा असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची पहिली प्रतिक्रिया आली
Ramdas Athawale : 'ती' खरी भीमशक्ती नाहीच; उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

सध्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार असल्याचे जोरदार चर्चा सुरु आहेत. त्याचे कारण म्हणजे, मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची बैठक. यावर आता रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, त्या युतीमध्ये भीमशक्ती नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "त्या युतीमध्ये भीमशक्ती नाही, तर ती प्रकाश आंबेडकरांची 'वंचित शक्ती' आहे. त्या शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. ती सगळी शक्ती माझ्याबरोबर आहे. त्यांची शक्ती आहे ती वंचित शक्ती. तसेच, एकनाथ शिंदे यांची खरी शिवशक्ती आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत असल्याने खरी शिवशक्ती आणि भीमशक्ती आम्ही आहोत. दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही." असे म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला.

पुढे टीका करताना त्यांनी सांगितले की, "प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरेंबरोबर गेले तरीही आमच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. कारण दलित समाज हा माझ्याबरोबर आहे. मी रिपब्लिकन पक्षाचे नाव अजूनही टिकवून ठेवले आहे. मुळातच, एका पक्षाला राजकारणात निवडून येता येत नाही. म्हणून आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in