Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ढाल-तलवार कुठे गेली? संजय राऊतांची टीका

बेळगावमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या वाहनांवरील झालेल्या हल्ल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र सरकारवर तोफ डागली आहे
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ढाल-तलवार कुठे गेली? संजय राऊतांची टीका

काल महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये एका टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. (Sanjay Raut) यानंतर आता महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद चांगलाच पेटला आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत टीका म्हणाले की, 'ज्या सरकारला महाराष्ट्राच्या सीमेचे रक्षण करता येत नाही, त्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ढाल तलवार कुठे गेली?' असा सवाल केला.

खासदार संजय राऊत माध्यमांशी सवांद साधताना म्हणाले की, "कर्नाटकातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत? मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाला ढाल तलवार ऐवजी कुलूप हीच निशाणी दिली पाहिजे. हे सरकार नामर्दच आहे." पुढे केंद्रावर आरोप करताना म्हणाले की, "ज्या पद्धतीने सीमाभागांमध्ये सरकारी प्रेरणेने जे काही सुरु आहे. कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील वाहानांची तोडफोड होत आहे. तर, दुसरीकडे, प्रतिकार करणारे आमच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून अटक करुन तुरुंगात डांबले जात आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in