Sanjay Raut ED : राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ, आरोपपत्र दाखल

या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात होता का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
Sanjay Raut ED : राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ, आरोपपत्र दाखल
ANI

ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला असून त्यांच्यासमोरील अडचणीही वाढवल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, संजय राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर ईडी कार्यालयाने उत्तर देणे आवश्यक होते. त्यानुसार ईडीने जामिनाला विरोध तर केलाच पण आता त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले आहे. पत्राचाळ प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट हात होता का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

आतापर्यंत राऊतांची केवळ पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू होती. पण यामध्ये राऊत यांचाही थेट सहभाग असल्याचे ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे राऊतांना दिलासा मिळेल असे चित्र असताना त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पीएमएलए कोर्टांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in