Sanjay Raut : संजय राऊतांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाला शिवीगाळ

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असून यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली
Sanjay Raut : संजय राऊतांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; निवडणूक आयोगाला शिवीगाळ

आधीच विधिमंडळावर केलेल्या विधानाचा वाद सुरु असताना पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर शिवी देत टीका केली. "निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का ****? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?" अशी संजय राऊत यांची जीभ घसरली. यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून विधानसभेत त्यांच्याविरोदहत हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी फक्त सत्तदाहरीच नव्हे तर विरोधी पक्षाच्या आमदारांनीदेखील केली. यानंतर पुन्हा एकदा आज सांगलीमध्ये एका कार्यक्रमात त्यांची जीभ घसरली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्याने संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

संजय राऊत यावेळी म्हणाले की, "संघर्ष करणे हा शिवसैनिकांचा गुण आहे. उपाशी पोटी राहुन घरची चटणी भाकर खाऊन तुम्हाला आमदार खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केले. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिले ते 50 खोके देवून पळून गेले. वरून आता निवडणूक आयोग सांगते की, शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का ****? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?" यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे तसेच भाजपवरही जोरदार निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in