
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या 'भारत राष्ट्र समिती' या पक्षाने महाराष्ट्रात विस्तार करायला सुरुवात केली आहे. या पक्षाने नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रात विस्ताराला सुरुवात केली आहे. यानंतर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भावर लक्ष केंद्रीत केलं आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेजवळील जिल्ह्यांवर या पक्षाचा सर्वात जास्त फोकस आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आषाढी एकादशीला आपल्या लवाजम्यासह पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात सभा देखील देखील घेतली. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५० गावांच्या सरपंच आणि उपसरपंचांना भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी जवळपास ६० वाहनांचा ताफा व दक्षिण सोलपूर तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांना मिळून एकून ३५० जणांना घेऊन हैदराबाद येथे जाऊन बीआरएस पक्षात प्रवेश केला.
यामुळे भारतीय जनात पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३८ गावांतील विद्यामान सरपंच, १२ माजी सरपंच आणि १२ ग्रामपंचायत सरपंच यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सरपंच आणि नेते भारत राष्ट्र समिती पक्षात गेल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका बीआरएस पक्ष लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी दिली आहे. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग, मतदार हे विद्यमान भाजप आमदाराला वैतागले आहेत. भारत राष्ट्र समिती हा पक्ष शेतकऱ्यांसाठी अनुकूल पक्ष आहे. असं सचिन सोनटक्के यांनी सांगितलं.