"मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा..." भरसभेत 'हे' काय बोलून शरद पवार

शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मिश्किल टीका केली.
"मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा..." भरसभेत 'हे' काय बोलून शरद पवार

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी काटेवाडीत हजेरी लावली. काटेवाडीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात जिथं सभा घेतल्या, तिथं आम्हाला विजयी झाल्या, असं शरद पवार म्हणाले.

मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा...

काटेवाडीत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मिश्किल टीका केली. ते म्हणाले की, "यावेळेला एक प्रकारची शक्ती दिल्लीपासून लावली. देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले. ज्या अठरा ठिकाणी ते आले, त्यापैकी आठ ते नऊ ठिकाणी एकच विषय होता, शरद पवार.. माझं भाग्य आहे, देशाचा पंतप्रधान निम्म्यावेळेला माझं नाव घेतो. काय साधं सुधी गोष्ट आहे का? कुठंही गेले की ते माझ्याबद्दल बोलत होते. मी एके ठिकाणी सांगितलं, इथून पुढं कुठल्या निवडणूका असतील, तर मोदीसाहेब तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा. त्यांनी लक्ष ठेवलं, की मत पडतात."

देशातील लोक शहाणी आहे...

शरद पवार यांनी देशातील मतदारांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, "या देशात लोकशाही आहे. जगातील अनेक ठिकाणी हुकूमशाही आहे. यावेळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न होता. पण या देशातील लोक आम्हा प्रशासन किंवा राजकारणातील लोकांपेक्षा शहाणे आहेत. तुमच्या शहाणपणामुळं देशातील लोकशाही टिकलीय. भारताचा जगात लोकशाहीप्रधान देश म्हणून जो लौकीक आहे, तो तुमच्यामुळं आहे. तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेनं देश कधी जाऊ देणार नाही. "

यंदाची निवडणूक सोपी नव्हती...

शरद पवार म्हणाले की, "यावर्षीची निवडणूक वेगळी होती. देशात कुठंही गेलो की लोक विचारायचे, बारामतीत काय होईल? माझं मन सांगायचं बारामतीकर कधी साथ सोडणार नाहीत. ते मन जे सांगायचं ते खरं झालं आणि निवडणूकीत यश मिळालं. सुप्रियाला तुम्ही चौथ्यांदा निवडून दिलं. सुप्रिया सुळेंची संसदेतील हजेरी ९८ टक्के आहे. लोकसभेत उपस्थित राहून लोकांचे प्रश्न मांडणारी म्हणून त्यांचा लौकीक आहे."

logo
marathi.freepressjournal.in