अजित पवार गटाने दिलेला प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळला ; आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

गेलेल्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केली असून ते माघारी आले तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे
अजित पवार गटाने दिलेला प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळला ; आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले...

आज (१६ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवास्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर अचानकपणे वायबी चव्हाण सेंटर येते जात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अचानक घेतल्या या भेटीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तसंच राजरीय वर्तूळात चर्चांना उधाण आलं. यावेळी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी एकसंध रहावी यासाठी सोबत काम करण्याची शरद पवार यांना विनंती केली. शरद पवांनी मात्र यावेळी मौन बाळगल्याचं सांगण्यात येत आहे. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, छनग भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की आम्ही शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आलो होतो. यावेळी त्यांना एकत्रित काम करण्यासाठी विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी आमचं म्हणणं ऐकूण घेतलं आमच्या प्रस्तावावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

फुटीतावादी गट वायबी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडल्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची एक बैठक संपन्न झाली. यावर जयंत पाटील म्हणाले की, गेलेल्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते माघारी आले तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल .

यानंतर शरद पवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी गेले. त्याठिकाणी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले की, आपल्याला पुरोगामी भूमिका घेऊन पुढे जायचं आहे. मला भाजपसोबत जायचं नसून संघर्ष करायचा आहे. असं म्हणत त्यांनी अजित पवार गटाने दिलेल्या प्रस्ताव फेटाळला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in