शिंदे गटातील आमदार उद्या मुंबईत; सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार

शिवसैनिक समर्थक आणि बंडखोर आमदार यांच्यात आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही
शिंदे गटातील आमदार उद्या मुंबईत; सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार
ANI

सध्या राज्याची सूत्र ही राज्याबाहेर असलेल्या बंडखोर आमदारांच्या निर्णयाभोवती फिरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बंडखोर आमदारांच्या गटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, गुवाहाटीला असलेले सर्व आमदार गुरुवार, ३० जून रोजी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. यावेळेस शिवसैनिक समर्थक आणि बंडखोर आमदार यांच्यात आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आज कामाख्या मंदिरात जाऊन देवीची पूजा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.

आमचे दोन तृतीयांश आमदार असून कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. ते म्हणाले की, येथील आमदार मोकळेपणाने काम करत आहेत. आम्ही सर्व शिवसेनेतच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बहुमताचा आकडा आमच्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदार आहेत. शिंदे म्हणाले की, कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केली नाही. आपल्या देशात बहुमत महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, आमच्याकडे बहुमत आहे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विकास करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाला भेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहणार आहोत. याशिवाय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मारकालाही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनाही आदरांजली वाहणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in