श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; धिरेंद्र कृष्ण महाराजांवर केले होते गंभीर आरोप

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकू अशी धमकी देण्यात आली होती
श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; धिरेंद्र कृष्ण महाराजांवर केले होते गंभीर आरोप

अगदी काही दिवसांपूर्वीच धिरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल केल्याप्रकरणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि सहअध्यक्ष श्याम मानव हे प्रकाशझोतात आले होते. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम मानव यांचा मुलगा क्षितिज यामिनी शाम यांच्या फोनवर अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला. यामध्ये त्या व्यक्तीने शिवीगाळ करत घरावर बाँब फेकून श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ते पुण्यातील बावधन परिसरात राहत असून त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बागेश्वर धामच्या पंडित धरेंद्र शास्त्री महाराजांना श्याम मानव यांनी दिलेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. श्याम मानव यांना घरावर बॉम्ब टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर शाम मानव यांच्या सुरक्षेमध्ये वाय दर्जाची वाढ करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in