
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर शिवसेना फोडल्याचा आरोप करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा खुलासा केला. शरद पवारांबद्दल मी कधीही अपशब्द बोललो नाही, मात्र आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना केसरकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला. “मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा त्यांनी खूप काही सांगितले. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते. आम्ही सर्व गोष्टींचे साक्षीदार आहोत. असे केसरकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्यावर अत्याचार का झाले? याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे. 'मातोश्री' कधी 'सिल्व्हर ओक'च्या दारात गेल्याचे ऐकले नाही. आपला पक्ष वाढावा आणि सत्तेत राहावे अशी शरद पवारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांनी ते कधीच मान्य केले नाही, असेही केसरकर म्हणाले होते.
'शरद पवार यांच्याबद्दल मी कधीही भाष्य केलेले नाही. माझ्या जडणघडणीत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नेत्यांपैकी शरद पवार हे एक आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या तोंडून एकही वाईट शब्द निघू शकत नाही. याव्यतिरिक्त कधी गरज लागल्यास मी स्वतः शरद पवार यांच्या घरी जाऊन माफी मागेन, असेही केसरकर म्हणाले.