नांदेड - इरोड, पूर्णा - तिरुपती एक्स्प्रेसच्या काही फेऱ्या रद्द

गाडी क्रमांक ०७१८९ नांदेड ते इरोड एक्स्प्रेस २९ सप्टेंबर आणि ६ ओक्टोंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
नांदेड - इरोड, पूर्णा - तिरुपती एक्स्प्रेसच्या काही फेऱ्या रद्द

नांदेड : गाडी क्रमांक ०७१८९ नांदेड ते इरोड एक्स्प्रेस २९ सप्टेंबर आणि ६ ओक्टोंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७१९० इरोड ते नांदेड एक्स्प्रेस १ आणि ८ ऑक्टोंबर, २०२३ ला रद्द करण्यात आली. गाडी क्रमांक ०७६०९ पूर्णा ते तिरुपती एक्स्प्रेस २५ सप्टेंबर, २ आणि ९ ओक्टोंबर, २०२३ रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७६१० तिरुपती ते पूर्णा एक्स्प्रेस २६ सप्टेंबर, ३ आणि १० ओक्टोंबर, २०२३ रोजी रद्द करण्यात आली आहे.

खानापूर ते हैदराबाद दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी क्रमांक १७६४८ पूर्णा-हैदराबाद एक्स्प्रेस २४ सप्टेंबरपासून पूर्णा ते हैदराबाद दरम्यान नियमित वेळापत्रक नुसार धावेल. हैदराबाद ते खानापूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आलेली गाडी क्रमांक १७६४७ हैदराबाद - पूर्णा एक्स्प्रेस २४ सप्टेंबर, २०२३ पासून हैदराबाद ते पूर्णा दरम्यान नियमित वेळापत्रकानुसार धावेल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in