छत्रपती संभाजीनगरला होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

तब्बल ७ वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरला होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

छत्रपती संभाजीनगर : पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर तब्बल ७ वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी ही बैठक होण्याची शक्यता असून, या बैठकीत मराठवाडा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मराठवाड्यात ४ ऑक्टोबर २०१६ ला मंत्रिमंडळाची बैठक झाली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीच्या नियोजनाचा प्रशासकीय स्तरावर तोंडी निरोप आला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे प्रस्ताव तयार करावेत. लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी, जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून सादर करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी विभागातील सातही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत.

सातत्याने कोरड्या आणि ओल्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना दिलास मिळावा तसेच विभागातील प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, यासाठी विभागात मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची सतत मागणी केली जाते. मात्र, मागील १५ वर्षांत केवळ दोन वेळ बैठक झाली आहे. २००८ साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात बैठक झाली होती. त्यानंतर २०१६ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संभाजीनगरला बैठक झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in