नांदेड शहरात कडकडीत बंद

शिवाजीनगर येथील एका चपला बुटाच्या दुकानावर तसेच कला मंदिर येथे एका थंडपेय विक्रीच्या दुकानावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
नांदेड शहरात कडकडीत बंद

नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून नांदेड शहरात मंगळवारी बंद पाळण्यात आला. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

नांदेड शहरातील प्रमुख बाजारपेठ बंद होती. बंद दरम्यान शहरात दोन ठिकाणी दगडफोडीच्या किरकोळ घटना घडल्या. यशिवाय रास्ता रोको, टायर जाळणे आदी आंदोलनही करण्यात आले. सकल मराठा समाजाच्या बांधवानी गटागटाने दुचाकीवर फिरून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात भाग पाडले. शहरातील शिवाजीनगर, श्रीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, आनंदनगर, वर्कशॉप, तरोडा बू. खुर्द आदी भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर किरकोळ वाहतूक सुरू होती. बसेस मात्र बाहेरगावी पाठविण्यात आल्या नाहीत.

मंगळवारी बंद दरम्यान शिवाजीनगर येथील एका चपला बुटाच्या दुकानावर तसेच कला मंदिर येथे एका थंडपेय विक्रीच्या दुकानावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बंद दरम्यान दोन्ही दुकाने उघडी ठेवल्याने आंदोलक चिडले होते. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठींबा आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे समन्वयक अंकुश कोल्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हसतक्षेप केल्याने त्यांचा प्रयत्न हाणून पडला. याशिवाय छत्रपती चौक येथे समाज बांधवानी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले, तर तरोडा खु येथून सोमवारी रात्री कँडल मोर्चा काढण्यात आला. यात अनेकांनी सहभाग नोदवला होता. शहरातील नवा मोंढा बाजारपेठ मंगळवारी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून बंद ठेवण्यात आली. बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in