बिहारमध्ये जेवणानंतर विद्यार्थ्यांना पोटदुखी व उलट्या; १५६ जण रुग्णालयात

बिहारमध्ये जेवणानंतर विद्यार्थ्यांना 
पोटदुखी व उलट्या; १५६ जण रुग्णालयात

बिहारमध्ये १५६ शालेय विद्यार्थांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण घेतल्यावर त्यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. सध्या १५६ शालेय विद्यार्थ्यांना पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

२२ मार्चला मंगळवारी बिहार दिवस साजरा करण्यात आला. पाटणाच्या गांधी मैदानातील या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

पाटणा येथे बिहार दिनानिमित्त दुपारचे जेवण केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे १५६हून अधिक विद्यार्थ्यांनी उपचारासाठी नोंदणी केली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी बहुतेकांनी पोटदुखी आणि उलट्या झाल्याची तक्रार केली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विभा सिंह यांनी दिली.

‘सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार केले जात आहेत. अन्नातून काही बाधा झाल्याचे सध्या आम्ही गृहीत धरलेय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समितीही स्थापन केली आहे,’ असे विभा सिंह यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.